कोरोनाबाधित अमेरिकेकडून नागरिकांना मोठा दिलासा
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
नवी दिल्ली | कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने मोठी घोषणा केली आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हॅक्सीन मोफत दिली जाणार आहे. संयुक्त राजाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सीन प्रभावित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याचे मोफत वितरण केले जाणार आहे. अमेरिकेने सहा व्हॅक्सीनच्या तयारीकरता १० बिलियन गुंतवणूक केली आहे. सर्व ट्रायल झाल्यानंतर व्हॅक्सीनचे करोडो डोस वितरीत केले जाणार आहे.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सीन डोस हे त्यांच्या खर्चाने देण्यात येणार आहेत. मात्र यामध्ये विमा कंपन्यांचा समावेश असणार आहे. AFP च्या हवाल्यानुसार, वरिष्ठ आरोग्य अधिकारी पॉल मँगो यांनी सांगितलं की, आम्ही खासगी विमा कंपन्यांशी बोलणं सुरू केलं आहे. अधिकारी यासाठी तयार देखील झाले आहेत. त्यांनी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ (NIH) चे दिग्दर्शक फ्रांसिस कोलिंसने अमेरिकेच्या सरकारने सहा व्हॅक्सीन प्रोजेक्टमध्ये एका वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॅक्सीन तयार केलं जाणार आहे.
अमेरिकेने एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे, व्हिसाधारकांना निवडक प्रकरणात अमेरिकेत येण्याची परवानगी मिळावी म्हणून नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.