Sushant Sing Suicide Case: बहिणीला टीमची जबाबदारी ते हॉलिवूड पदार्पण, सुशांतच्या डायरीत 2020 चे प्लॅनिंग
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत चालल्या आहेत. सुशांतच्या मृत्यूला 59 दिवस उलटले असताना सुशांतच्या डायरीतील 15 पाने समोर आलेली आहेत. यामध्ये सुशांतने हॉलिवूड पदार्पणापासून कंपनीच्या भविष्यातील वाटचालींचे नियोजन केल्याचे दिसत आहे.
सुशांतच्या डायरीत बहीण प्रियांकाचाही उल्लेख आहे. प्रियंका सुशांतच्या टीमला हॅंडल करेल असे त्याने डायरीत लिहिलेले आहे. आपली अभिनय कारकीर्द सावरण्यासाठी काय करता येईल, याबाबतही सुशांतने विचार करुन ठेवलेला होता. यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचाही त्याने विचार केलेला होता. एखादा सीन उठावदार होण्यासाठी कोणता प्रयोग आणि कोणती पद्धत वापरली पाहिजे, त्याची तयारी कशी करावी, याविषयी सुशांतने लिहिलेले आहे. आपली वाक्य पाठ करु नका, ती फील करा आणि नंतर कॅमेर्यासमोर म्हणा, असेही त्याने लिहिलेले आहे.