#CoronaVirus: रशियाकडे या 20 देशांकडून कोरोनाच्या लससाठी ऑर्डर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images-14.jpeg)
मुंबई: जगभरातील 20 देशांनी आमच्या लस Sputnik V साठी प्री-ऑर्डर दिलेली आहे. रशियाचं डायरेक्ट इंवेस्टमेंट फंड मोठ्या प्रमाणात लसी तयार करण्यासाठी आणि परदेशात जाहिरात करण्यासाठी गुंतवणूक करीत आहेत, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिलेली आहे.
भारत, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, ब्राझिल, मेक्सिको या देशांनी ही लस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा रशियाच्या वेबसाईटने केलेला आहे. रशियाच्या वेबसाईटनुसार, 2020 च्या अखेरपर्यंत या लसीचे 20 कोटी डोस तयार करण्यात येण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. यापैकी 3 कोटी डोस रशिया स्वत:साठी ठेवणार आहे. या लसीचं उत्पादन सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. रशियाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक देशांमध्ये करण्याची योजना आखत आहे. यामध्ये सौदी अरब, ब्राझिल, भारत आणि फिलीपाईन्स या देशांचा समावेश आहे.