सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आज रिया चक्रवर्तीसह चौघांची ईडीकडून चौकशी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sushant-Singh-Rajput-Rhea-chakraborty.jpg)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीने आतापर्यंत सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची ८ तास आणि तिचा भाऊ शोविकची तब्बल १८ तास चौकशी केली आहे. मात्र आता ईडीने पुन्हा रिया आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना चौकशीसाठी बोलावले आहे.आज त्यांच्यासह रियाचा भाऊ शोविक आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ याचीही ईडीकरून चौकशी होणार आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यावरून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचा या चौकशीत तपास केला जात आहे. तसेच ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांचे इतर व्यवहारदेखील तपासण्यास सुरुवात केली आहे. या आत्महत्या प्रकरणात आर्थिक अपहार असल्याच्या संशायावरून ही चौकशी सुरू आहे. तसेच सुशांतच्या खात्यावरून रियाचा भाऊ शौविकच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे शौविक याची कसून चौकशी सुरू आहे.