Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील ‘त्या’ खुनातील आरोपी २४ तासांत गजाआड; बहादूर पोलिसांचे कौतुक

पिंपरी । जुन्या भांडणाच्या तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून एका रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा काल दिनांक ०८/०८/२०२० रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास चारचणांनी मिळून खून केला . खुनातील आरोपींना भोसरी पोलीसांनी आज दिनांक ९ /८/२०२० रोजी चोवीस तासाच्या आत सापळा रचून अटक केली आहे.

मयुर हरीदास मडके(रा. आळंदी पुणे) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे.

रोशन हरी सौडतकर ( रा . दिघी रोड , भोसरी , पुणे), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा . देवंग्रा , ता . औसा , जि . लातुर ), प्रणेश चंद्रकात घोरपडे , (रा . विजयनगर , दिघी , पुणे ), शुभम बलराम वाणी (रा . चौधरी पार्क दिधी , पुणे ) वैभव तान्हाजी ढोरे (रा . भवानी पेठ , काशेवाडी , पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला आरोपी मयुर मडके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याचा खून करून त्याचे साथीदार हे लातुर ला पळुन जाणार असल्याबाबत पोलीस कर्मचारी सुमीत देवकर व समिर रासकर यांना महिती मिळाली . त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . शंकर आवताडे यांनी तपास पथकाचे सहा . पोलीस निरीक्षक श्री . सिध्देश्वर कैलासे यांची टिम बनवून आरोपीचे मोबाईल फोनचे टॉवर लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला . आरोपी हे सोलापुर हायवेने लातुरला पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून पाटस टोलनाका येथे ताब्यात घेण्यात आले अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

सदर कामगिरी मा . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड श्री . संदीप बिष्णाई साो . , मा . अप्पर पोलीस आयुक्त श्री . रामनाथ पोकळे साो . , मा . पोलीस उपआयुक्त , परिमंडळ -१ , श्रीमती स्मिता पाटील मॅडम , मा , सहाय्यक पोलीस आयुक्त श्री . रामचंद्र जाधव , साो . पिंपरी विभाग , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . शंकर आवताडे , यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे , पोउनि महेंद्र गाढवे , पो . कर्मचारी गणेश हिंगे सुमीत देवकर , समीर रासकर , आशिष गोपी , संतोष महाडीक यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group