Breaking-newsराष्ट्रिय
देशात गेल्या २४ तासांत ६२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले
![Record of 38 thousand 949 new corona sufferers in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoronaVirus-in-india.jpg)
नवी दिल्ली – भारतात दिवसागणिक आणि तासागनिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेले अनेक दिवस रोज ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या आता तब्बल ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, देशात आतापर्यंत १३ लाख ७८ हजार १०६ जण कोरोनामुक्ता झाले आहेत. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.