Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! ‘मी माझ्या मेव्हण्याचा खून केला’ रक्ताने माखलेला चाकू घेऊन थेट तरूणानं गाठलं पोलीस स्टेशन
जळगाव: कोरोनाच्या संकटामुळे राज्यात आधीच लॉकडाऊन आहे. या काळात गुन्ह्यांच्या अनेक भयानक घटना समोर आल्या आहेत. हत्येचा असाच एक प्रकार जळगावमध्ये समोर आलेला आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या रागात तरुणाने मेव्हण्याची हत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणाने हत्येनंतर रक्ताने माखलेला चाकू घेऊन थेट पोलीस स्थानक गाठलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपुर्वी लग्न झालं असताना पती-पत्नीमध्ये नेहमी वाद भांडण व्हायचं. म्हणून पत्नी कायम माहेरी रहायची. पण आपल्या बहिणीला नांदवत नाही या गोष्टीचा राग आल्याने तरुणाने प्लॅन आखत मेव्हण्याला रस्त्यावरच गाठलं. त्याला ठार मारत रक्ताने माखलेला चाकू घेवून तो तेथुन थेट पोलीस स्टेशनला गेला आहे.