Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला अंडरवर्ल्डचा दबाव कारणीभूत ?

विशेष – ( सुजित ठमके )

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला साधारण एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला, परंतु मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच अजून पॅरेण्ट कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहचलेले नाहीयेत. त्यातच सुशांत सिंगच्या आत्महत्येचा संबंध अंडरवर्ल्डच्या दबावाशी असून, मोठ्या प्रोजेक्ट करिता स्टारची होत असलेली अदलाबदली ही कारण असू शकतात असं म्हटलं जात होत.मात्र तशी शक्यता खूप कमी आहे. मुळात आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात सुशांत सिंग यांच्या वेगवेगळ्या खात्यात ९० कोटी असल्याचे निष्पन्न झाले. महागड्या गाड्या आणि त्याचं स्टार डॅम लाईफ स्टाईल बघता त्याच्या आत्महत्येचं कारण हे आर्थिक तणाव नसल्याचं स्पष्ट झालं.

बॉलिवूड वर नेहमीच अंडरवर्ल्ड चा प्रभाव असतो हे पूर्ण सत्य असले तरीही २०१० नंतर बॉलिवूड इंडस्ट्री पूर्णता बदलली आहे. २०१० पूर्वी अंडरवर्ल्ड निर्माते, दिग्दर्शक यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत असत. कुठल्या चित्रपटात कुठल्या अभिनेत्रीला आणि अभिनेत्याला मुख्य भूमिका द्यायची हे अंडरवर्ल्ड २०१० पूर्ण ठरवायचे. परंतु २०१० नंतर बॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट सेक्टर च्या उद्योजकांनी गुंतवणूक करणे सुरु केल्यामुळे अंडरवर्ल्ड चा प्रभाव आणि दबदबा ओसरला. बरेच अंडरवर्ल्ड डॉन चे कंबरडे मुंबई पोलिस आणि क्राईम ब्रांच ने मोडून काढले तर काही जेल मध्ये आहेत. त्यामुळे सुशांत सिंग यांच्या आत्महत्येस अंडरवर्ल्ड चा दबाव असल्याची शक्यता नगण्य आहे. एकेकाळची आघाडीची अभिनेत्री दिव्या भारती ची आत्महत्या अंडरवर्ल्ड मधून झाली होती परंतु सुशांत सिंग च्या आत्महत्येस हा ऍंगल नगण्य वाटतो.

अंकिता लोखंडे सोबत सुशांतचा झालेलं ब्रेकअप आणि त्यातून सुशांतला आलेले नैराश्य, एकटेपण, भावनिक दुरावा यामुळे ही सुशांतनं आत्महत्येचा विचार केला असेन असंही म्हटलं जात आहे. परंतु सुशांत सिंग – अंकिता लोखंडे यांच्या पवित्र रिश्ता मध्ये दुरावा कुणी निर्माण केला हा दुवा महत्वाचा आहे. आणि याची उकल करणे मुंबई पोलीस क्राईम पुढे मोठे आव्हान आहे. रिया चक्रवर्ती यांची सुशांत सिंग सोबतची जवळीक हे अंकिता आणि सुशांत च्या ब्रेक अप चे कारण होते का ? आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करणे मुंबई पोलीस प्रयत्न करतच आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button