Breaking-newsराष्ट्रिय
देशात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला, नव्या नियमावलीनुसार जीम, योगा सुरू होणार
![A complete curfew in Parbhani from 7 pm to 31 March this evening](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/CoroanLockdown-4-1.jpg)
नवी दिल्ली – गृहमंत्रालयाने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार देशात कन्टेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असला तरीही कन्टेन्मेंट झोनव्यतरिक्त इतर ठिकाणी Unlock 3 च्या प्रक्रियेत काही सोयी सुविधाही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ५ ऑगस्टपासून जिम सुरू करण्यात येणार असून मेट्रो, रेल्वे सुविधा ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्रालयाने काही निर्णय घेतले असून हे निर्णय नियमावलीत प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
नव्या नियमावलीत काय सांगितलं?
- रात्रीच्या काळात लागू केलेला जमाव आणि संचारबंदीचा नियम काढण्यात आला आहे.
- ५ ऑगस्टपासून योगा क्लासेस आणि जिम सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, कुटुंब आणि आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना जारी करण्यात येतील. त्यानुसार, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं अनिवार्य राहणार आहे.
- १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिन्स्टन्सिंग आणि इतर अनेक आरोग्याचे नियम पाळणं अनिवार्य राहणार आहे.
- ३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत.
- आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद राहणार असून केवळ वंदे भारत योजनाच सुरू राहणार आहे.
- मेट्रो सेवा, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजक पार्क, नाट्यगृह, बार बंदच राहणार आहेत. तर, सामाजिक, राजकीय, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बंदी ठेवण्यात आली आहे.
- राज्य सरकारने आपल्या राज्यातील कंन्टेमेंट झोन राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार त्याच कंन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कंन्टेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर ठिकाणी काही सूट देण्यात आल्या आहेत.