Breaking-newsराष्ट्रिय
देशात गेल्या २४ तासांत ४७,७०४ नवे कोरोना रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Corona-test-hero-a219365.jpg)
नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४७,७०४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच, ६५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एकून बाधितांचा आकडा १४,८३,१५७ इतका झाला असून ४,९६,४९८ एक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ९,५२,७४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आत्तापर्यंत राज्यात ३३,४२५ जणांना मृत्यू झाला आहे.
देशात नमूने तपासण्याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. गेल्या २ दिवसांत १० लाखांपेक्षा जास्त नसूने तपासण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. २६ आणि २६ जुलैला दर दिवशी ५ लाखांपेक्षा जास्त नमून्यांची चाचणी करण्यात आली आहे. २७ जुलैला १,७३,३४,८८५ नमूने तापसण्यात आले आहेत.