Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना चौकशीला बोलावलं जात आहे. आता या प्रकरणात दिग्दर्शक महेश भट आणि धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुख करण जोहर यांना चौकशीसाठी बोलवण्याची दाट शक्यता आहे.

तसेच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अपूर्व मेहता यांना देखील सोमवारी चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. अपूर्व मेहता यांना वांद्रे पोलिसांनी समन्स पाठवलेला आहे. यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button