breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

डोंबिवलीकरांचा घरबसल्या लोकल ट्रेनचा प्रवास; पहा व्हिडिओ

कोरोना व्हायरसमुळे सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही लॉकडाऊन कायम आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबई, ठाणेसह कल्याण-डोंबिवलीतही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊमध्ये महत्त्वाची कोणती गोष्ट बंद पडली असेल तर ती म्हणजे मुंबईकरांची लोकल ट्रेन.

मुंबईमध्ये कामाला जाण्यासाठी दररोज लाखो नागरिक लोकल ट्रेनचा वापर करतात. तथापि, लॉकडाऊनमुळे सध्या स्थिती बदलली आहे. पण या सर्वांमध्ये सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात काही नागरिक मात्र एका आगळ्या-वेगळ्या प्रकारे घरी लोकल ट्रेनमधून प्रवासाची आठवण काढतायत. हा व्हिडिओ इतका भन्नाट आहे की पाहून दररोज लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकानांही आपले जुने दिवस आठवतील.

या व्हिडिओची रेकॉर्डिंग एका घरात करण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला एक मुलगी खिडकी जवळ बसलेली दिसत आहे. या खिडकीवर डोंबिवली असे दिसत आहे. पुढे ट्रेनचा दरवाजा म्हणून तीन पुरुष घराच्या दारावर उभे दिसत आहे.त्यानंतर काही बायका स्टेशन आल्यावर घरात म्हणजे ट्रेनमध्ये चढतात. हा मजेदार व्हिडिओ ट्रेनमधून नियमितपणे प्रवास करणाऱ्याला त्यांच्या जुन्या दिवसाची आठवण नक्कीच करून देईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button