कोरोनावरील लस संशोधनात Oxford university ला मोठं यश
![43% vaccination in five states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/vaccine-3.jpg)
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग आणि त्यामुळं संक्रमित होणाऱ्यांची झपाट्यानं वाढणारी संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. पण, बहुतांश देशांमधाल काही भागांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याची बाबही नाकारता येत नाही. त्यातच आता कोरोनावरील लस संशोधन प्रक्रियेला वेग आल्यामुळं अतिशय सकारात्मक असे परिणाम समोर येऊ लागले आहेत. सोमवारी विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडूनही याबाबतची सकारात्मक बातमी समोर आली.
कित्येक महिन्यांपासून कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठीची लस शोधण्यासाठी म्हणून संशोधकांनी कसोशीनं प्रयत्न केले होते. अखेर ऑक्सफर्डच्या या प्रयत्नाना यश आलं असून, या लसीच्या चाचणीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्याबाबतचाच एक व्हिडिओ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला.
जानेवारी महितन्यापासूनच ऑक्सफर्डमधील संशोधक कोरोनासाठीच्या लसीच्या संशोधन प्रक्रियेवर काम करत होते. सध्या ते या लसीच्या मानवी चाचणीच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याव पोहोचले आहेत. Lancet, Phase 1 results मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार लसीमुळं कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आहे किंवा तिचे विपरीत परिणाम होत नाही आहेत. शिवाय या लसीमुळं मानवी शरीरात उत्तम रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती होत आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये ही लोगप्रतिकारक शक्ती कोविडविरोधात संरक्षणात्मक ठरते का, हे पाहिलं जाणार आहे. शिवाय कोणकोणत्या वयोगटातील व्यक्तींवर या लसीचा काय परिणाम होतो याचंही परीक्षण केलं जाणार आहे. सध्या या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ज्यासाठी आम्ही हजारो स्वयंसेवकांचे आभार मानतो, अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली.