breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
मान गये सोनू…महाराष्ट्र पोलिसांना २५ हजार ‘फेसशिल्ड’ची भेट
मुंबई । बिहार आणि उत्तर प्रदेशातील स्थलांतरित कामगारांना आपल्या मूळगावी परतण्यासाठी पुढाकार घेणारा अभिनेता सोनू सुद याने आणखी एक विधायक उपक्रम हाती घेतला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २५ हजार फेसशिल्ड देण्यात येणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि सोनू सुद यांची विविध विषयांवर आज चर्चा झाली. यावेळी सुद यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचे कौतूक केले. तसेच, गृहमंत्री देशमुख यांनी सुद यांनी केलेल्या मदतीबाबत आभार मानले आहेत.