दूषित पाण्यामुळे नागरिकांना जूलाब उलट्यांचा त्रास; स्थायी सभापतींना नाही गांभिर्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-8.jpg)
स्थायी समितीची आॅनलाईन सभा, पाणी पुरवठा अधिका-यांना कधी विचारणार जाब?
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना महामारीच्या संकटाच्या सामना करताना आता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे जूलाब उलट्यांचा त्रास होवू लागला आहे. या परस्थितीत पाणी पुरवठा अधिका-यांना जाब विचारुन कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, आॅनलाईन सभेमुळे त्या अधिका-यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता. असं कारण देवून स्थायी समिती सभापतींनी पाणी पुरवठा अधिका-यांना एक प्रकारे पाठिशी घालण्याचा प्रकार केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती आज (शुक्रवारी) गुगल मीटद्वारे आॅनलाईन सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थायी संतोष लोंढे होते.
सध्या पावसाळा सुरू असून पिंपरी चिंचवडकरांना जुलाब उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाने खासगी दवाखाने व रुग्णालयांकडून कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या, कावीळ झालेल्या रुग्णांची नोंद करुन माहिती मागवली आहे. शहरात अतिसाराचे रुग्ण आढळून येवू लागले असून नागरिकांच्या पाणीपुरवठा दूषित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
दरम्यान, पाण्यात सुरक्षित प्रमाणात क्लोरीन करणे गरजेचे आहे. पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य याविषयी खात्री करावी, पाण्यात कोणतेही अपायकारक जिवाणू, विषाणू नाहीत याची खातरजमा करण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन अणु जीव चाचण्या कराव्यात, वितरण व्यवस्थेतील पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य खातरजमा करणे अपेक्षित आहे. परंतू, दूषित पाण्यावरुन नागरिकांना त्रास होत असतानाही स्थायी समिती सभापतींकडून अधिका-यांना धारेवर धरुन जाब विचारला जात नसल्याचे दिसून आले आहे.