breaking-newsमहाराष्ट्र
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह
मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. थोरातांच्या शासकीय बंगल्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती.
बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते.थोरात यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली होती. काल रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.