अमेरिकेविरुद्ध कॅनडाची जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/usa-.jpg)
ओटावा (कॅनडा) – कॅनेडाने अमेरिकेच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार केली आहे. कॅनडाकडून आयात होणाऱ्या स्टील आंणि अल्युमिनियमवर अमेरिकेने लागू केलेल्या आयात कराच्या विरोधात ही तक्रार करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा अखंड राखण्याच्या खोट्या बहाण्याने अमेरिका लागू करत असलेला वाढीव आयात कर जागतिक व्यापार संघटनेच्या बांधिलकीच्या विरोधात आहे, असे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री क्रिस्टिया फ्रीलॅंड यांनी म्हटले आहे.
कॅनडाने अमेरिकेच्या विरोधात केलेल्या आयात कराबाबतच्या या तक्रारीबाबत युरोपियन संघ कॅनडाला मदत करणार आहे. युरोपियन संघानेही यापूर्वीच अमेरिका लागू करत असलेल्या आयात कराच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे आपली तक्रार नोंदवली आहे.
नाफ्टा (नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ऍग्रीमेंट) च्या 24 व्या व्यापारविवाद कलमानुसार अमेरिकेच्या आयात कर धोरणाची समीक्षा करण्यात यावी अशी मागणी कॅनडाने जागतिक् व्यापार संघटनेकडे केली आहे. नोराड (नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड) आणि नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) अंतर्गत कॅनडा अमेरिकेचा सहयोगी देश असल्याचा उल्लेख क्रिस्तिया फ्रीलॅंड यांनी केला आहे.
अमेरिकेने गेल्या गुरुवारी कॅनडा, मेक्सिको आणि युरोपियन युनियनल देण्यात येणारी आयात करसवलत बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. युरोपियन संघानेही अमेरिकन उत्पादनांवर आयात कर लगू करण्याचा निर्णय जाहीर केला होती.
ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनीही अमेरिकेच्या आयात कराबाबतचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ब्रिट्न अणि संपूर्ण युरोपियन संघाला स्टील आणि अल्युमिनियमवरील आयात करापासून मुक्त ठेवण्यावर त्यांनी जोर दिला आहे.