दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनाला यशस्वीपणे मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/download-7.jpg)
मुंबई : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनाला यशस्वीपणे मात दिली आहे. सत्येंद्र जैन यांची आज (२६ जून) केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यानंतर आरोग्यमंत्र्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाली होती. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची पहिली कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्या चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील साकेत परिसरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. ५५ वर्षीय जैन यांन प्लाझ्मा थेरेपीही देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. अखेर आज त्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आता त्यांना आजच रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.