पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू!
![A nine-day curfew in Pandharpur on Ashadi Wari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/vitthal-temple-pandharpur1.jpg)
पंढरपूर | आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात 29 जून ते 2 जूलै दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव जिल्ह्याधिका-यांकडे देण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिकक्ष अतुल झेंडेे यांनी दिली आहे.
आषाढी वारिनिमित्त मोठ्या संख्येने भक्त पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्शी लाखो भाविक आषाढी यात्रेनिनित्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र यंदा या वारीवर कोरोनाचं सावट असल्याने भाविकांना येथे न येण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पंढरपूर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवाय पंढरपुरात येणा-या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान संचारबंदी लागू केली जाणार असली तरी, शहरांत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती अतुल झेंडेे यांनी दिली आहे.