Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्रं खेळत होता Pubg, नंतर उचललं टोकाचं पाऊल

यवतमाळ: पब्जी (Pubg) या गेमच्या आहारी गेल्यामुळे एक तरुण मुलानं गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निखिल पुरुषोत्तम पिलेवान असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. निखिल यानं घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेवून स्वत:ला संपवलं आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपुर या गावात ही घटना घडलेली आहे. निखिल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये कामावर होता. बीए फायनलचे पेपर देण्यासाठी तो गावाकडे आलेला होता.





