Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

चिंताजनक! आत्महत्येपूर्वी सुशांत सिंग खेळत होता प्लेस्टेशनवर गेम? व्हायरल व्हिडीओ मुळे पुन्हा एकदा खळबळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना त्याचा मित्रपरिवार, कुटुंबीय, सहकलाकार आणि चाहते यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. दरम्यान अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पत आहेत.

तसच यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील बोलण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. सुशांतचे काही जुने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, वारंवार त्याच्या जाण्याचे दु:ख उभारून येत आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरून देखील हा व्हिडीओ फॉरवर्ड केला जात आहे. या व्हिडीओतून असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button