Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘या’ राज्यात पुन्हा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला
कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल (२४ जून) राज्यात लागू असलेला लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील लॉकडाऊनचा कालावधी ३० जूनला संपणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला.
‘लॉकडाऊनसदर्भात नेत्यांमध्ये विचारांची भिन्नता दिसून येते. पण, लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे, असे ममता बॅनर्जी राज्य सचिवालयासमोर सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत म्हणाल्या आहेत.





