Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना कोरोनाची लागण
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना ‘कोरोना’ची लागण झालेली आहे. दोघा वाहनचालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली आहे. सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.