breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राहुल गांधींचे पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह ट्वीट
नवी दिल्ली | पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वतःला सादर करू पाहणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आज पुन्हा एक ट्वीट केले आहे. सर्वपक्षीय बैठकीत देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर काँग्रेसने पंतप्रधानांना पाठिंबा जाहीर केला असला तरी राहुल यांनी मोदींविषयी ट्वीट करताना मुद्दाम पंतप्रधानांचे नाव नरेंद्र मोदी नाही तर सुरेंदर मोदी असे नमूद केले आहे. विशेष म्हणजे जपान टाइम्समधील एका भारत-चीन विषयावरील लेखाची लिंक जोडत हे ट्वीट करण्यात आले आहे.