Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीच्या परिस्थितीवर गृहमंत्र्यांची 5 दिवसात चौथी बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/arvind.jpg)
नवी दिल्ली | दिल्लीमध्ये कोरोनाच्या परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वरिष्ट अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरूआहे. कोरोना व्यवस्थापनाविषयी अमित शाह पाच दिवसांमध्ये चौथ्या वेळी बैठक घेत आहेत.
कोरोना रुग्णांना असुविधा आणि कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याच्या तक्रारीनंतर सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात दिल्ली सरकारला फटकारले होते. यानंतर शाह यांनी सूत्र हातात घेतली आहे. ते केजरीवाल यांच्या सीटवर बसले असल्याचे दिसत आहे.