breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात मुसळधार पावसाने पंचगगा नदीची पाणी पातळी आता 23 फुटांवर,17 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने पंचगगा नदीची पाणी पातळी आता 23 फुटांवर येऊन पोहचली आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात 2-3 दिवसांपासून संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगगा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे. त्यामुळे पंचगगा नदीचं विस्तारलेलं पात्र कोल्हापूरकरांना मागील वर्षीच्या महापूराची आठवण करुन देतंय. पहिल्याच पावसात बंधारे पाणीखाली गेल्यानं नदीकाठावरील गावांना धडकी भरली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा व सांगली जिल्ह्यात गेल्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्या मोसमातील पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचगंगा नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गेल्यावर्षी या 3 जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला होता. अलमट्टी धरणातून पाणी वेळेवर न सोडल्यामुळे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाने जलसाठ्यांमधील पाणी पातळी वेगाने वाढत आहे. मागीलवर्षी जून आणि जुलैमध्ये अशाच मुसळधार पावसाने महापुराची स्थिती तयार झाली. याचा फटका मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी भागाला बसला. यामध्ये शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. एकूणच कृष्णा व पंचगंगा नदीला अलमट्टी धरणामुळे महापुराची स्थिती तयार होत असते. गेल्यावर्षी अलमट्टी धरणातून पाणी वेळेवर न सोडल्यामुळे पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता.

गेल्या वर्षी पूरग्रस्त हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणाच्या भूमिकेचा महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना दरवर्षी तोटा होतो. याचपार्श्वभूमीवर पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीवर योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button