breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘सावरकरांच्या नाही तर भगत सिंगांच्या स्वप्नातील भारत बनवायचाय’

पूर्णिया | महाईन्यूज |

संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, काल लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन करण्यात आलेले आहे.बिहारमधील पूर्णियामध्ये सुद्धा सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पूर्णियामधील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी सहभाग घेतलेला होता. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे.

आपल्याला सावरकरांच्या स्वप्नातील भारत बनवायचा नाही तर भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत बनवायचा आहे, असे सांगत कन्हैया कुमार यांनी पुन्हा आझादीच्या घोषणा दिल्या आहेत. तसेच, एनआरसीचा परिणाम पाहता सतर्क राहण्याचे आवाहन करत हा फक्त हिंदू-मुस्लीम असा विषय नसून संविधानाचा मुद्दा आहे. हा संघर्ष एका दिवसाचा नसून बऱ्याच दिवसांचा असल्याचे कन्हैया कुमार म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button