#CoronaVirus: औरंगाबादमध्ये कोरोनाचा हाहाकार! १२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या २ हजार २७१ वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024-1.jpg)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. एकीकडे लॉकडाउने निर्बंध हळूहळू शिथील होत असताना, दुसरीकडे मात्र करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमधील रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत आहे.औरंगाबाद जिल्ह्या आज सकाळी ११४ नव्या करोनाबाधितांची नोंद झालेली होती. त्यात दुपारी आणखी सात रुग्णांची भर पडून नव्या करोनाबाधितांची आज दुपारपर्यंतची संख्या १२१ पर्यंत पोहचलेली आहे.
तर, औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार २७१ झाली आहे. यापैकी १ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, सद्यस्थितीस ८७२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. तसेच, आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ४१ महिला व ८० पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज दुपारी सात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2271 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 872 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.https://t.co/D5ojz6cDYj pic.twitter.com/IY8tptYTSb
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) June 10, 2020
जिल्ह्यात आज सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 865 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) June 10, 2020
सविस्तर : https://t.co/tzAiZuQYTT#coronavirus pic.twitter.com/2ohiPN0R62