#CycloneNisarga: रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, सिंधुदुर्गात पावसाचा वेग मंदावला!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Screenshot_20200603_105010.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट ओढावले (Cyclone Nisarga Mumbai Rain) आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळधडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.
मुंबईत काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाचा जोर अद्याप कायम आहे. मुंबईत गेल्या 12 तासात 20 ते 40 मिलीमीटर इतका पाऊस झाला. मुंबईतील कुलाबा, दादर, जुहू आणि मरिन ड्राईव्ह या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समु्द्राजवळील किनारपट्टीच्या भागांमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.