बीडीपी समस्या सोडण्यासाठी धोरण: राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
पुणेः गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेशी संबंधित विषयांकरिता आणि प्रलंबित विकास कामांसाठी बैठक घेतली होती. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील शहरातील विकास कामांच्या माहितीसाठी महापालिकेची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या डोंगरमाथा, डोंगरउतार तसेच बीडीपी म्हणजेच जैवविविधता उद्यानाबाबताच्या समस्या सोडण्यासाठी धोरण तयार करणार असल्याचे माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या सूचना केल्या असून लवकर धोरण तयार केले जाणार असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
पुणे शहरातील समान पाणीपुरवठा योजना, अतिक्रमणे, मालमत्ता कर, जायका, घनकचरा व्यवस्थापन, पाणीवाटप, दोन्ही कॅन्टोन्मेंटमधील नागरी भाग पुणे महापालिकेत समाविष्ट करणे, स्त्यांचा प्रश्न आदी प्रश्नांबात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात पुणे शहरातील विविध भागात असलेल्या बीडीपी, डोंगर उतार, डोंगरमाथ्यावरील बांधकाम याबाबतच सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानुसार धोरण तयार केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार’; संजय राऊतांची मोठी घोषणा
आगामी १०० दिवसांचा रोडमॅपचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून याची माहिती मिसाळ यांनी प्रशासनाने दिली. पुणे शहरातील विविध भागात असलेल्या बीडीपी, डोंगर उतार, डोंगरमाथ्यावरील बांधकाम याबाबतच सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानुसार धोरण तयार केले जाणार आहे, असेही माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांची कर वसुली ही पीएमआरडीकडे आहे. या गावांमध्ये कराच्या स्वरुपात त्यांना महसूल जमा होत आहे. यामुळे सामाविष्ठ गावांना पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पीएमआरडीची आहे. त्यामुळे पीएमआरडीकडे जमा होणारा महसूल महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचा विचार सुरू असून यावर निर्णय झाल्यास हा प्रश्न मार्गी लागेल, असे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.