Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या बैठकीला सुरु, मोठे निर्णय घेण्यात येण्याची अपेक्षा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. 30 मे रोजी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळालचे पहिले वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर यानंतर मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक आहे. या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, पीएम निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेयर्स (सीसीईए) आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) यांचीही बैठक होऊ शकते. या दोन्ही बैठकीत आर्थिक मुद्दे आणि चीनच्या लडाखमधील हालचालींवर चर्चा होऊ शकते.

रविवारी 31 मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्प संपला आहे. आजपासून अनलॉक-1 सुरू झाले आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ई-परमिटची आवश्यकता नाही. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. याआधी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत निर्बंध होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button