Breaking-newsमनोरंजन
मधू चोप्रा म्हणतायत – विदेशी जावई नकोच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/madhu-and-priyanka-chopra1-.jpg)
- देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या एका ‘परदेसी बाबू’च्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. स्वत:पेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत प्रियांका रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांना डेट करताहेत.
निक सध्या २५ वर्षांचा आहे तर प्रियांकाने पस्तिशी ओलांडलीय. अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक झाला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीतही दिसले होते. त्यांचा तेथील वावर बरेच काही सांगणारा होता. पण प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना विचाराल तर त्यांनी या सगळ्या अफवा ठरवल्या आहेत. मी कुण्या विदेशीसोबत प्रियांकाच्या लग्नाची कल्पनाही करू शकत नाही. या सगळ्या अफवा आहेत. मीडिया काहीही लिहितो, असे त्यांनी म्हटले आहे.