सलमान खानची नव्या क्षेत्रात उडी, ग्रूमिंग ब्रँड लाँच, सॅनिटायझरची निर्मिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Salman-Khan-Frsh-Grooming-Brand.jpg)
मुंबई : अभिनेता सलमान खानने स्वत:चा ग्रूमिंग ब्रँड लाँच केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने ‘फ्रेश’ (FRSH!) या ब्रँडचे अनावरण केले. सॅनिटायझरसह शरीराची निगा राखणाऱ्या काही उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे.
ईदच्या मुहूर्तावर अभिनेता सलमान खान आपल्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची मेजवानी देत असतो. मात्र यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे ईदच्या पूर्वसंध्येला सलमानने ग्रूमिंग ब्रँड लाँच करत चाहत्यांना खुशखबर दिली.
सलमान खान फक्त अभिनेता-निर्माताच नाही, तर उद्योजक म्हणूनही समोर आला आहे. ‘बीईंग ह्युमन’ या कपड्यांच्या ब्रँडने स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्याने ज्वेलरी क्षेत्रातही पाऊल ठेवलं. ‘बीईंग ह्युमन’ अंतर्गत त्याने आता ‘फ्रेश’ हा ग्रूमिंग ब्रँड आणला आहे.
“माझा नवीन सौंदर्य आणि पर्सनल केअर ब्रँड लाँच करत आहे. FRSH! हा आहे तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा ब्रँड, जो तुमच्यापर्यंत उत्तम उत्पादने आणेल. सॅनिटायझर उपलब्ध आहेत. नक्की वापरुन पहा” अशा आशयाचं ट्वीट सलमान खानने केलं आहे.