बायचुंग भुतियाच्या राजकीय पक्षाची स्थापना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/hamro-sikkim.jpg)
गंगटोक – भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याच्या नव्या राजकीय पक्षाची काल औपचारिक स्थापना झाली. हमरो सिक्कीम पार्टी (एचएसपी) असे नाव पक्षाला देण्यात आला आहे. भुतियाचा पक्ष सिक्कीममध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाला आहे. भुतियाने तृणमूल कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतली. तृणमूलच्या तिकिटावर त्याने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूूकही लढवली.
मात्र, त्यात त्याला अपयश आले. आता स्वत:च्या सिक्कीम राज्यात नव्या राजकीय खेळीसाठी तो सरसावला आहे. दरम्यान, नव्या पक्ष स्थापनेनिमित्त झालेल्या सभेत बोलताना भुतिया याने सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग आणि त्यांच्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. विकासाचा संपूर्ण अभाव असलेल्या सिक्कीममध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप त्याने केला.