#Lockdown: विविध राज्यांमध्ये टाळेबंदीत शिथिलता
महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी, पंजाब-केरळमध्ये बससेवा सुरू
टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राने राज्यांना दिल्याने विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांमध्ये दुकाने, व्यवहार सुरू करण्यावर भर दिला. रुतलेले अर्थचक्र गतिमान झाले पाहिजे यावर साऱ्याच राज्यांचा कटाक्ष आहे. जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य दुकाने सुरू करण्याचा राज्यांनी प्रयत्न केला आहे.
कर्नाटक, दिल्ली या राज्यांनी दुकाने व अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. दिल्लीत मात्र दुकाने सुरू ठेवण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला जाईल. कर्नाटकने करोनाचे जास्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि केरळ या चार राज्यांमधील नागरिकांनी प्रवेशबंदी केली.
दिल्ली सरकारने तर क्रीडा संकुले खुली केली असली तरी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. कर्नाटक सरकारने उद्याने आणि बागा काही ठरावीक वेळेसाठी खुली ठेवण्यास मान्यता दिली.