breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड शहरात आढळले सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक २२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे एकाच परिसरात दहापेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या २२६ वर पोहचली आहे. तर आज सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १३१ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे रहाटणी, भाटनगर, भोसरी, आनंदनगर चिंचवड, दिघी, येरवडा आणि नवी मुंबई या परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.