Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: आपण कोरोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे- नितिन गडकरी

आपण करोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने पाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. बाहेर वावरताना मास्क लावलाच पाहिजे. एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. तसंच सॅनेटायझरचा वापर हा ऑफिसमध्ये किंवा घरात प्रवेश करण्याआधी आणि बाहेर पडताना केला पाहिजे असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.





