#CoronaVirus: ‘टिकटॉक’ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटींची मदत
भारतात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘टिकटॉक’ने करोनाच्या लढाईत एक दमदार पाऊल टाकले आहे. या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा देखील केला आहे.
#COVID_19 विरुद्धच्या लढ्यात @TikTok_IN @BytedanceTalk चा सक्रिय सहभाग. #मुख्यमंत्रीसहायतानिधी -कोविड१९ साठी ५ कोटी रुपयांची मदत, त्याशिवाय महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे मानले आभार. pic.twitter.com/okUeZ1MMR1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 28, 2020
देशात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी टिकटॉक कंपनी पुढे आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे मनापासून आभार मानले आहेत. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून अॅपच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे करोनाविरोधात लढा देत आहोत याची माहिती दिली.
या पत्रात टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी म्हणतात, “महाराष्ट्रात आणि मुंबईत टिकटॉकसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारावर आहे. त्यामुळेच या राज्याप्रती दायित्वाच्या भावनेची आम्हाला जाणीव आहे. राज्याच्या पोलीस दलासाठी एक लाख मास्क उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.