breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#CoronaVirus: गेली दोन वर्ष माझ्यासाठी क्वारंटाइनप्रमाणेच : सोनाली बेंद्रे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Vikram_Sharma_VSD1945.png)
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत सर्वच जण आपापल्या घरांमध्येच आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं आपण लॉकडाउनचा कालावधी कसा घालवत आहे यावर माहिती दिली. “गेली दोन वर्ष माझ्यासाठी क्वारंटाइनप्रमाणेच होती. त्यामुळे हा कालावधीही मला त्याच प्रमाणे वाटत आहे,” असं मत तिनं व्यक्त केलं आहे. २०१८ मध्ये सोनाली बेंद्रे हिला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर तिनं आपला बहुतांश वेळ घरातला घालवला होता.