सलूनमध्ये केस कापायला गेलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/saloon.jpg)
मुंबई | कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असताना काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. मात्र अजूनही मद्यविक्री, सलून आणि मॉल्सवरील लॉकडाऊन कायम आहे. असं असतानाही मध्यप्रदेशमधील खरगौन जिल्हयातील सलूनमधून ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या सलूनमधून कोरोना व्हायरस पसरल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच खूप मोठा गोंधळ उडाला आहे. तात्काळ हे सलून बंद करण्यात आलं आहे.
सलूनमधून या ९ लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही ६० वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या २ महिन्यात एकूण २० नवे रूग्ण आढळले आहेत. तसेच जिल्ह्यातील ६ लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच सकाळी आणखी तिघांची रिपोर्ट निगेटिव्ह आली असून यामध्ये ३ वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे.