Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचे ४६६ नवे रुग्ण चोवीस तासात ९ मृत्यू,रुग्णसंख्या ४६०० पार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-11.jpg)
महाराष्ट्रात करोनाचे ४६६ नवे रुग्ण मागील चोवीस तासात आढळले आहेत. संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची संख्या समोर आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४६६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. चोवीस तासात ६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देणअयात आल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४६६६ इतकी झाली आहे.