Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई महानगरपालिकेला माझा सलाम – जावेद अख्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Jawed-Akhtar.jpg)
मुंबई | देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ आहेच. मात्र, देशात सगळ्यात जास्त कोरोना पॉझिटिव्ब रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिका ज्याप्रकारे काम करत आहे ते खरंच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या कामगिरीचे कौतुक प्रसिद्ध कवि आणि लेखक जावेद अख्तर यांनीही केले आहे. भारतात सगळ्यात जास्त कोरोनाच्या टेस्ट या मुंबईत केल्या आहेत. त्यामूळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. मात्र,, महापालिका उत्तम काम करत त्यांच्यावर उपचारही करत आहे. त्यामूळे त्यांचे विशेष कौतुकही जावेद अख्तर यांनी ट्विटरवरुन केले आहे.