#CoronaVirus: लुडो खेळताना शिंकल्यानंतर ‘हा घे कोरोना’ म्हणाल्याने संतापलेल्या मित्राने थेट गोळीच घातली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/shoot.jpg)
उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये लुडो खेळताना खोकल्यावरुन वाद झाल्याने एका व्यक्तीने आपल्या मित्रावरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील दयानगरमधील मंदिराजवळ काहीजण लुडो खेळत होते. त्यावेळी एकजण खोकला आणि त्यानंतर त्याने हा घे करोना असं विनोद केला. यावरुन झालेल्या वादामधून त्याच्या मित्राने देशी बनावटीच्या पिस्तुलीमधून या व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून अनेकजण गोळा झाले. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल केलं.
ग्रेटर नोएडाचे पोलिस उपायुक्त राजेश कुमार सिंग यांनी एआयएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. एका व्यक्तीने त्याच्यासोबत लुडो खेळत असणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला. या दोघांमध्ये शिंकण्यावरुन भांड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे,’ असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयवीर उर्फ गुल्लू आणि प्रशांत उर्फ प्रवेश हे दोघे इतर दोन मित्रांबरोबर साईथाली मंदिराजवळ लुडो खेळत होते. हे चौघे लुडो खेळत असतानाच प्रशांतला शिंक आली. त्यामुळे संतापलेल्या गुल्लूने ‘तुला करोना पसरवायचा आहे का?’ असा सवाल विचारला. त्यावेळी प्रशांतने पुन्हा एकदा गुल्लूला डिवचण्यासाठी शिंकण्याचं नाटक केलं आणि ‘हा घे करोना’ असं मस्करीमध्ये म्हटलं. प्रशांतने केलेल्या मस्करीमुळे गुल्लूचा पार चढला शाब्दिक बाचाबाचीवरुन सुरु झालेला वाद हणामारीपर्यंत वाढला आणि त्यामधूनच संतापलेल्या प्रशांतने त्याच्याकडील देशी पिस्तुलीमधून गुल्लूवर गोळीबार केला.
A man in #GreaterNoida allegedly shot at his friend for sneezing while playing #Ludo. The victim was critically injured in the incident.
— IANS (@ians_india) April 15, 2020
DCP Rajesh Kumar Singh: "On Tuesday, a man shot at his friend following an altercation over sneezing while playing Ludo game with two others." pic.twitter.com/kcEuHpiNlu