#CoronaVirus: राज्यात कोरोना बाधितांचा आकडा आता 1,666 वर,तर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जास्त
राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालाल आहे…हा आकडा आता १, ६६६ वर पोहोचला आहे. शनिवारी म्हणजे आज दुपारपर्यंतची ही आकडेवारी आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात दुपारपर्यंत ९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे यातील सर्वाधिक ७२ रुग्ण हे मुंबईतील आहेत.
आजच्या दिवसातील रुग्णांची आकडेवारी
मुंबई – ७२
औरंगाबाद – २
मालेगाव- ५
पनवेल – २
कल्याण- डोंबिवली- १
ठाणे – ४
नाशिक – २
अहमदनगर- १
पिंपरी चिंचवड – १
वसई- विरार- १
राज्यात मुंबईत रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे म्हणून कोरोना विषाणूच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या आणि डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांवरही लक्ष ठेवण्याचे आणि त्यांच्या तब्येतीचा फॉलोअप घेण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेनं दिले आहेत. पालिकेनं २४ वॉर्डनां डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणे पुन्हा आढळली असल्याची कोणतीही केस अद्याप समोर आलेली नाही तरीही खबरदारीचा उपाय म्हणून २४ विभागातील कोरोना रुग्णांचा पूर्ण फॉलोअप घेण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.