Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाग्रस्तांची भारतातील संख्या अडीच हजारहून अधिक झाली आहे. तर शुक्रवारपर्यंत करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६२ वर पोहचली आहेत. देशामध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.