#CoronaVirus | मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
मुंबई | कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याआधी धारावीमध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. आता बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या वडाळा बस डेपोत पुरवठा विभागात हा कर्मचारी काम करत आहे.
दरम्यान, या कर्मचाऱ्याला एसआरव्ही रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले आहे.या बेस्ट कर्मचाऱ्याच्या संपर्कात आणखी काही कर्मचारी आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. शुक्रवारी हा कर्मचारी कामावर दाखल झाला होता. मात्र, आधी हा कर्मचारी सुट्टीवर होता. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोठे गेला होता. त्याच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच मुंबईच्या टिळकनगर भागात हा कर्मचारी राहत होता, त्या इमारतीला सील केले गेले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा अधिक धोका वाढला आहे.