Breaking-newsताज्या घडामोडी
हॉस्पिटलला उकिरडा पाहून तुकाराम मुंढे संतापले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/TUKARAM-MUNDHE.jpg)
नागपूर | नागपूर महापालिका हॉस्पिटलला आलेली उकिरड्याची अवकळा पाहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चांगलाच संताप झाला. काम करायचं नसेल तर घरी जा, असा सक्त इशारा मुंढे यांनी डॉक्टरांना दिला.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला. ‘नागपूर महापालिकेचं सर्वात चांगलं रुग्णालय उकिरड्यासारखं झालं आहे, हे खपवून घेणार नाही’ अशी ताकीद तुकाराम मुंढे यांनी दिली.
‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी वॉर रुममध्येच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापलं. प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडते, यावरही मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कोरोना’शी लढण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.