breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी भाजी मंडई नेस्तनाबूत, महापालिकेची धडाकेबाज कारवाई
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. संचारबंदी लागू असताना पिंपरी भाजी मंडईत तीन फुटांचे सुरक्षित अंतर न ठेवता नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पिंपरीतील अनधिकृत भाजी मंडईतील गाड्यांवर आज बुधवारी (दि. १) रोजी कारवाई केली.