शक्तिमान मालिकेचा सीक्वल येणार; अभिनेते मुकेश खन्ना यांची माहिती

दूरदर्शनवर प्रक्षेपित होणारी शक्तीमान ही भारतातील सर्वात लोकप्रिय सुपरहीरो मालिका होती. ९० च्या दशकातील साऱ्याच मुलांना या मालिकेने अक्षरशः वेड लावलं होतं. मुकेश खन्ना यांनी शक्तिमान आणि गंगाधार या दोन भूमिका साकारल्या होत्या. मुकेश यांच्यासाठी सुपरपॉवरचीही मालिका फार खास आहे. रामानंद सागर यांच्या रामायण आणि बीआर चोप्रा यांच्या महाभारतचं पुनःप्रक्षेपण डीडीवर करण्यात आलं आहे. अशात शक्तिमान मालिकाही पुन्हा दाखवण्याची मागणी होत आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन आहे. मालिकांचं चित्रीकरणही थांबलं आहे. याचमुळे प्रेक्षकांसाठी जुन्या प्रसिद्ध मालिकांचं पुनःप्रक्षेपण करण्यात येत आहे. यात रामायण, महाभारत, व्योमकेश बक्क्षी, सर्कस यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचा समावेश आहे. या सगळ्यात शक्तीमान मालिका अजून सुरू न केल्यामुळे चाहत्यांनी ही मालिकाही लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे…
अभिनेते मुकेश खन्ना यांनी फक्त शक्तिमानची व्यक्तिरेखाच साकारली नव्हती, तर या मालिकेचे ते निर्मातेही होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शक्तीमानच्या सीक्वलवर काम करत असल्याचं सांगितलं. मुकेश म्हणाले की, ‘गेल्या तीन वर्षांपासून शक्तिमानच्या दुसऱ्या भागावर काम सुरू आहे. आज समाजात घडत असलेल्या गोष्टींवर ही मालिका भाष्य करेल. याशिवाय नैतिक शिक्षणही यातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.’
मात्र सध्यातरी ईतर मालिकांप्रमाणे शक्तिमान मालिका पुन्हा सुरु होण्याची घोषणा कधी होतेय याकडे सर्व चाहत्याचं लक्ष लागल आहे…





