breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: २५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण
घाटकोपरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. करोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्याने या तरुणाला रोगाची लागण झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या महिलेच्या कुटुंबियांचीही करोना चाचणी करण्यात आली आहे.
मात्र त्या चाचण्या निगेटीव्ह आल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. या महिलेच्या कुटुंबियांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने विलगीकरणामध्ये ठेवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे घर झोपडपट्टीमध्ये अगदी आजूबाजूच्या घरांना लागून असल्याने तिथे तिच्या कुटुंबियांना विलगीकरणामध्ये ठेवणं शक्य नसल्याने त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हे कुटुंब पुढील चौदा दिवस पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असणार आहे.